पिंपरी चिंचवड पालिकेच्या तीन अभियंत्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत उद्यान व ग्रीन स्पेसेस विकसित करण्याच्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत तीन अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली.

पिंपरी : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत उद्यान व ग्रीन स्पेसेस विकसित करण्याच्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत तीन अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी खुलासा केल्यानंतर खातेनिहाय चौकशी रद्द करून 500 रुपये दंडाची कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, उपअभियंता विजय जाधव व सुनीलदत्त नरोटे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. जाधव व नरोटे यांच्यावर अमृत योजनेतील कामाची जबाबदारी आहे. दिरंगाई केल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. तर पर्यवेक्षकीय कामात कसूर केल्याने वाघुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. या तिघांनी केलेला खुलासा व विभागप्रमुखांनी केलेली शिफारस यामुळे कारवाई शिथिल करून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारला. दंडाची रक्कम नजीकच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action of 3 engineers of Pimpri Chinchwad MC

टॅग्स