खडकवासला, सिंहगड परिसरात फिरायला जाताय? मग ही बातमी वाचाच

खडकवासला, सिंहगड परिसरात फिरायला जाताय? मग ही बातमी वाचाच

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला, सिंहगड व पानशेत भागात फिरण्यासाठी निघालेल्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 280 नागरिकांवर हवेली पोलिस स्टेशन व खडकवासला ग्रामपंचायतीने धडक कारवाई करत एकाच दिवसात तब्बल 28 हजार रुपये दंड वसूल केला आहे. कारवाई करून पर्यटकांची वाहने खडकवासला धरण चौकातूनच मागे फिरवण्यात आली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खडकवासला, सिंहगड पानशेत, वरसगाव ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद राहतील असे आदेश जारी केले आहेत. परंतु जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडून अनेक पर्यटक या भागामध्ये फिरण्यासाठी येतात.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, खानापूर ही गावे जिल्हा प्रशासनाने आदेश काढून कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे या भागातून विनाकारण फिरण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. दुचाकीवरुन एकच व्यक्ती व चार चाकी वाहनातून तीन व्यक्ती प्रवास करतील असे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सकाळपासूनच हवेली पोलिस स्टेशन व खडकवासला ग्रामपंचायत यांनी संयुक्तरित्या नाकेबंदी केली होती. त्यानुसार विनाकारण फिरण्यासाठी आलेल्या व वाहतुकीचे नियम मोडणार्‍या 280 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व त्या माध्यमातून 28 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्या रविवार असल्याने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उद्याही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांच्याकडून सांगण्यात आले. पर्यटकांना खडकवासला धरण चौकातून पुढे जाऊ दिले जात नाही व दंडही वसूल केला जात असल्याने लोकांनी घरातच राहावे असे आवाहन हवेली पोलिस स्टेशन व खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com