
बारामती तालुक्यात 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत 119202 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामती : शुक्रवारी (ता. 15) होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोलिस दल सज्ज झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज दिली. तसेच या निवडणूकीसाठी पोलिसांनी 64 जणांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मतदान उरकून संबंधिताने तालुक्याबाहेर जायचे आहे.
मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय
बारामती तालुक्यात 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत 119202 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सदरची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांसाठी 40 अधिकारी, 300 पोलिस कर्मचारी व 350 होमगार्ड तैनात करण्यात येणार असून त्यार रिझर्व्ह सेंट्रल फोर्सचे पथक असून राज्य राखीव दलाच्याही दोन तुकड्या तैनात करण्यातयेणार आहे. या निवडणूकीसाठी एकूण 28 विभाग करण्यात आले असून प्रत्येक सेक्टरसाठी एक वाहन, एक अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी, दोन होमगार्ड असे पथक मतदानादरम्यान परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहे.
पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?
दरम्यान बारामती तालुक्याली संवेदनशील गावात पोलिसांनी रुटमार्च काढत शक्तीप्रदर्शन केले आहे. वडगाव निंबाळकर, को-हाळे, निंबूत, नीरावागज, पिंपळी, सांगवी, सोनगाव, सावळ, मोढवे, मळद, होळ, कांबळेश्वर आदी ग्रामपंचायतींवर पोलिसांची विशेष नजर असेल.
आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
64 जण दोन दिवसांसाठी तडीपार-या निवडणूकीसाठी पोलिसांनी 64 जणांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मतदान उरकून संबंधिताने तालुक्याबाहेर जायचे आहे. निवडणूक प्रक्रीयेस बाधा येईल असे कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कठोर कायदेशीर कारवाई करतील, असा इशारा नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)