पुणे : बेकायदा बाईक-टॅक्सी चालकांवर कारवाई

आरटीओने ताब्यात घेतलेल्या दुचाकींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
Biker
BikerSakal
Summary

आरटीओने ताब्यात घेतलेल्या दुचाकींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

- अमोल अवचिते

पुणे - बेकायदा बाईक-टॅक्सी चालकांवर (Illegal Bike Taxi Driver) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) (RTO) स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करून एकूण ४०३ दुचाकी (Two Wheeler) ताब्यात घेतल्या आहेत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई (Crime) करण्यात येत असून आतापर्यंत ८९ दुचाकीचालक दंडात्मक कारवाईला सामोरे गेले आहेत. तसेच, कारवाईची प्रक्रिया पूर्ण केलेल्या १५ दुचाकी आरटीओने सोडल्या आहेत.

आरटीओने ताब्यात घेतलेल्या दुचाकींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याने दुचाकी चालकाला दंडासह वाहतुकीचा करही भरावा लागणार आहे. त्यानुसार वाहन परमीट नियमानुसार एका सिटप्रमाणे ३०६ रुपयांचा कर वसूल केला जात आहे. तसेच, चालक हाच मालक असल्यास गाडीचे कागदपत्रे सादर करून त्याला १० ते २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, तर दुचाकीचा मालक एक आणि चालक दुसरा असल्यास त्याला २० ते ३० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, असे आरटीओ सांगितले.

शहरात मोठ्या संख्येने दुचाकीचालक बाईक-टॅक्सी या व्यवसायात उतरलेले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने त्यांनी तीव्र विरोध केला. बाईक-टॅक्सीच्या ॲपवर कायमस्वरूपी बंदी आणावी. या मागणीसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी एकत्र येत आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन केले होते. शिवाय, हा व्यवसाय बेकायदा असल्याचे आरटीओ कार्यालयाने प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले होते. कारवाईचा इशाराही दिला होता.

स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून व कडक कारवाईमुळे या व्यवसायाला आळा बसला आहे. ताब्यात घेतलेल्या दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी या सेवेचा वापर करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.

- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ

भरारी पथकाकडून अशी कारवाई...

बाईक-टॅक्सी चालकांवर थेट कारवाई करण्यास अडचणी येत असल्याने आरटीओ कार्यालयाने यावर युक्ती शोधली. भरारी पथकातील आठ निरीक्षकांवर स्टिंग ऑपरेशनची जबाबदारी सोपवली, त्यानुसार ते शहरात विविध ठिकाणी डमी ग्राहक म्हणून थांबतात. ॲपवरून बुकिंग करतात. बाईक-टॅक्सी चालक त्यांच्या सोयीनुसार सेवा देण्यासाठी ॲपवरील विनंती स्वीकारतात, तो येताच त्याच्या दुचाकीवर बसून त्याला आरटीओ कार्यालयात आणले जाते. कायद्याचा बडगा दाखवत दुचाकी ताब्यात घेतली जाते. पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com