कामठे मित्र मंडळावर येवलेवाडीत कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 सप्टेंबर 2018

गोकुळनगर, ता. 23 : येवलेवाडीतील कामठे पाटील मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांवर ध्वनिप्रदूषणअंतर्गत कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली. डीजे वाजविल्याबद्दल पर्यावरण संरक्षक कायद्याअंतर्गत 1886 कलम 15 नुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मंडळाचे 13 लाख 44 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. 

याबाबत कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी सांगितले की, कामठे पाटील मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाची आवाज मर्यादा कर्कश असल्याचे आढळले, तसेच डीजे व साहित्य वाहून नेणारे ट्रॅक्‍टर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे होते. मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकारी तुषार कामठे, प्रदीप कामठे, अविन कामठे, नवनाथ कामठे, राहुल कामठे, (सर्व रा. कामठे पाटील नगर, येवलेवाडी) व डीजेचे मालक सिद्धार्थ कांबळे, चालक अजय थोरात यांच्याविरुद्ध कर्कश आवाजात डीजे वाजविणे व वाहतुकीस अडथळा आणणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Action against Kamathe Mitra Mandal in yevalewadi