नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई "सर्जिकल स्ट्राइक' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे  - ""गडचिरोली येथे पोलिस आणि विशेष पथकाने नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेली कारवाई ही किरकोळ नाही. नक्षलवादी आता शाळा व महाविद्यालयांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांची जीवितहानी होऊ न देता 39 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालत जप्त केलेली शस्त्रसामग्री हे "सर्जिकल स्ट्राइक'सारखेच यश आहे,'' अशा शब्दांत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईच्या यशाचे वर्णन केले. 

एका कार्यक्रमानिमित्त अहिर शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात भाष्य केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'च्या कारवाईत प्रत्यक्ष सहभागी झालेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निंभोरकर सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 

अहिर म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड इच्छाशक्तीने काम करत आहेत. कोणत्याही कारणाने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात "सर्जिकल स्ट्राइक' करून आपण मोठे यश प्राप्त केले. त्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढले आहे. ईशान्य भारतात अनेक अडचणी होत्या; मात्र आज तेथील परिस्थिती बदलली आहे. फुटीरतावादी संघटना आता राष्ट्रीय प्रवाहात आल्या आहेत. हे केंद्र सरकारचे यश आहे. डोकलामची परिस्थिती ज्या पद्धतीने भारताने हाताळली त्यामुळे चीनला सुद्धा हे मानावे लागले, की आता भारत 1962चा राहिलेला नाही.'' 

लष्करातील जवानांना जेवणासह अन्य सुविधा पुरविण्यात काही त्रुटी राहत असल्यामुळे जवानांमध्ये असंतोष आहे, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होत होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे नाही. लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यामध्ये चांगले संबंध असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असल्यामुळे अधिकाऱ्यांसाठी प्राण देण्याचीही त्यांची तयारी असते. त्यामुळे जवानांमध्ये असंतोष नाही. 
-राजेंद्र निंभोरकर, लेफ्टनंट जनरल 

Web Title: Action against Naxalites Surgical Strike