औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

aundh.jpg
aundh.jpg

बालेवाडी/ औंध (पुणे) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात पुन्हा दहा  दिवसांसाठी लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. यास बाणेर -बालेवाडी व औंधमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवा, औषध उपचार तसेच सरकारी कार्यालय, आय.टी मधील कर्मचारी या व्यतिरिक्त इतर नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. या परिसरातील दूध डेअरी, औषध दुकान, दवाखाने,  बँका वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. सफाई कर्मचारी, स्मार्ट सिटी कडून रस्त्याचे काम करणारे कामगार तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, गॅस सिलेंडर पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय आपआपली कामे नियोजनाप्रमाणे करताना दिसत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, पुणे माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासूनच बाणेर येथील सदानंद हॉटेल जवळ विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. या ठिकाणी सकाळपासून तीन वाहनांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण तरीही लॉक डाउनला चांगला प्रतिसाद आहे. फक्त अत्यावश्यक सेवा,  औषध उपचार घेण्यासाठी आणि पास असलेले लोक घराबाहेर पडत आहेत.

-राजेश माळेगावे, सहायक पोलिस निरीक्षक चतुश्रृंगी पोलिस स्टेशन

कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी हे लॉकडाउन केले ते एका अर्थी बरेच झाले. एवढी रुग्णसंख्या वाढूनही नागरिकांना परिस्थितीचे गांभिर्य न समजल्याने शासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

-अमर वाबळे, रहिवासी,  बाणेर

औंधमध्ये कडकडीत लाॅकडाउनमुळे रस्ते मोकळे
औंधमधील राजीव गांधी पुलाजवळ, विद्यापीठ चौक, बाणेर महाळुंगे रस्त्यावर पुणे हद्दीत सदानंद हाॅटेल जवळ व  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत राधा चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणारांना प्रवेश बंद आहे. तर अशांवर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. औंध, आयटी आय रस्ता,संघवी नगर, बाणेर रस्ता, पाषाण -सूस रस्ता, औंध-विद्यापीठ रस्त्यासह मुंबई बॅंगलोर महामार्गावरही तुरळक वाहतुक सुरु होती. विशेष म्हणजे भाजीपाला, किराणा दुकाने बंद असल्याने येथे खरेदीच्या निमित्ताने येणाऱ्यांनीही बाहेर जाणे टाळले. नागरिकांनी आजच्या लाॅकडाऊनचे  काटेकोर पालन केल्याने सर्वच भागात रस्ते रिकामे दिसून आले. यामुळे एकंदरीत आज औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी,  बोपोडी या परिसरात रस्ते रिकामे झालेले आढळून आले. तर पोलिस प्रशासनाच्या वतीनेही कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अनावश्यक फिरणारे आज रस्त्यावर फिरकलेच नसल्याचे दिसून आले.

 आधीच्या लाॅकडाउनच्या काळात अनेकजण अडचणीत आलेले आहेत. त्यातच यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. कोरोना रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन नुसार बंदी घातली जावी. सरसकट व्यवहार बंद केल्याने आर्थिक व्यवस्था ढासळत आहे. तर दुसरीकडे सोसायटीच्या पदाधिका-यांनाही निर्णय घेतांना काही प्रमाणात अडचणी येत आहेत.
 -रुपेश जुनवणे, औंध.

 

सध्या अधूनमधून लाॅकडाउन लागू केले जात असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुकान भाडे, कामगारांचा पगार द्यायचा असतो. परंतु त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत नाही. तरीही  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  सरकारने जारी केलेला आदेश पाळणे बंधनकारकच आहे.

-सागर अहिवळे, सकाळ नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com