नारायणगावकरांनो जरा जपून, परिसरात होतेय जोरदार कारवाई... 

नारायणगावकरांनो जरा जपून, परिसरात होतेय जोरदार कारवाई... 

नारायणगाव : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत परिसर २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान सात दिवस प्रतिबंधित क्षेत्र(कंटेनमेंट झोन) जाहीर केला आहे.या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन न करणारे व्यावसायिक,वाहन चालक, विनाकारण व विनामास्क फिरणारे यांच्यावर नारायणगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, विनामास्क असलेल्या १५३ व्यक्ती ,नियम बाह्य वाहतूक करणारे ७७ वाहन चालक  यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.तसेच सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या व प्रतिबंधित क्षेत्र असून दुकान सुरू ठेवणाऱ्या वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

लोकसंख्येची जास्त घनता असलेली जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारुळवाडी ही गावे जून अखेर कोरोना मुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस प्रशासन यांना यश आले होते. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मागील दीड महिन्यात या भागात सुमारे अडीचशे कोरोना रुग्ण आढळून आले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.नियमांचे उल्लंघन करुन मोठ्या धुमधडाक्यात येडगाव व धालेवाडी येथील झालेल्या दोन विवाहांमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही दोन गावे हॉटस्पॉट झाल्याने उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी नारायणगाव व वारुळवाडी ही दोन गावे २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान सात दिवस प्रतिबंधित क्षेत्र(कंटेनमेंट झोन) म्हणून जाहीर केली आहेत. मात्र अद्यापही बहुतेक नागरिक, व्यापारी,वाहन चालक नियम व अटींचे पालन करत नसल्याचे आढळून येत आहे.या मुळे व अटींचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे.या भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे .कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नियम व अटींचे पालन करून नागरिक ,व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन गुंड यांनी केले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com