जिल्ह्यातील 93 बियर बार, वाईन शॉपवर कारवाई; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन

जिल्ह्यातील 93 बियर बार, वाईन शॉपवर कारवाई; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन

पुणे - राज्य सरकारने बियर बार, वाईन शॉप सुरू करण्यास नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी दिली. मात्र, काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील अशा 93 बियर बार, वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉपींना यापूर्वीच परवानगी दिली होती. त्यानंतर रेस्टॉरंट-बियर बार सुरू करण्यासही नुकतीच परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी बार-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची 50 टक्‍के मर्यादेचे उल्लंघन होऊ नये. त्या पद्धतीने टेबलची मांडणी करण्यात यावी. स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही, हे तपासण्यासाठी पथकेही नेमण्यात आली आहेत. या पथकांनी सात ऑक्‍टोबरपासून तपासणी सुरू केली आहे. पथकांनी काही बियर बार, वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉपींमध्ये जाऊन तपासणी केली. त्यात जिल्ह्यातील 93 बियर बार, वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉपींचालकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बार चालकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर पुन्हा नियम मोडल्यास दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे. 

कारवाई केलेल्या परमीट रूम-बार, वाईन शॉपची संख्या 
(7 ऑक्‍टोबर ते 19 ऑक्‍टोबरपर्यंत) : 
पुणे शहर 57 
पुणे ग्रामीण 23 
पिंपरी-चिंचवड 13 

पुणे जिल्ह्यात सध्या सुरू असलेले बार, वाईन शॉपी - (कंसात एकूण परवानाधारक संख्या) 
बियर बार रेस्टॉरंट 596 (1911) 
वाईन शॉप 267 (277) 
देशी दारूची दुकाने 248 (292) 
बियर शॉपी 489 (590) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यातील सर्व बियर बार, वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉपी परवानाधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे. जेणेकरून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. नवरात्र आणि सणासुदीच्या कालावधीत परवानाधारकांनी विशेष खबरदारी घ्यावी. 
- संतोष झगडे, पुणे जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com