बारामती तालुक्यात वन विभागाची अतिक्रमणांवर कारवाई

संतोष आटोळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुका वन विभागाच्या माध्यमातुन वनक्षेत्रामध्ये अतिक्रमणे करणांविरोधात ठोस भूमिक घेतली जात आहे. यानुरुप पहिल्या टप्प्यात तालुक्यातील पारवडी, कन्हेरी, पिंपळी येथील अतिक्रमणे सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये 15 हेक्टर अतिक्रमीत क्षेत्रातील पिके काढुन वनक्षेत्र अतिक्रमण मूक्त करण्यात आले.वन विभागाच्या या कारवाईचे वन्यप्रेमींमधुन स्वागत होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यात 6 हजार 500 हेक्टर वन क्षेत्र आहे. तालुक्यातील वनक्षेत्र 'इको टुरिझम'च्या माध्यमातून वनअधिकारी, कर्मचार्‍यांना मार्फत वेगवेगळी कामे केली जात आहेत. या वनक्षेत्रात चिंकारा, हरिण, खोकड, कोल्हे, लांडगे, ससे असे वन्यप्राणी आढळतात. त्यामध्ये चिंकाराचे प्रमाण जास्त आहे. मात्र गेल्या काही वर्षापासुन तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये शासनाकडुन वाटप झालेल्या शेतकऱ्यांनी तसेच वनक्षेत्राच्या बाजु्च्या शेतकऱ्यांनी वनक्षेत्रात अतिक्रमणे केल्याचे प्रकार पुढे आले. यापार्श्वभूमिवर सहाय्यक वनसंरक्षण पुणे मधुकर तेलंग यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव, बारामती विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.फरांदे, वनपरिमंडल अधिकारी त्रिंबक जराड, वनरक्षक संध्या कांबळे, रोहन इंगवले, अनिल खोमणे, तानाजी पिचड यांच्या सह वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली.

यामध्ये पारवडी येथील 1 हेक्टर, पिंपळी येथील साडेपाच हेक्टर, तर कन्हेरी येथील सात हेक्टर अतिक्रमणे काढण्यात आली.यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, डाळींब, तसेच इतर पिके कोणत्याही दबावाला न जुमानता जेसेबी व ट्रँक्टरच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आली. यामुळे सदर वनक्षेत्र अतिक्रमण मूक्त झाले.याबाबत वन्यप्रेमींमधुन समाधान व्यक्त होत आहे.

वनक्षेत्र ही देशाची मालमत्ता आहे. या माध्यमातुन निर्सगाची अन्नसाखळी चालत असते. तसेच अनेक वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती या वनक्षेत्रात असतात यांचे संगोपन करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.यापार्श्वभूमिवर वनक्षेत्राच्या लगत शेतीक्षेत्र असलेल्या किंवा शासकिय नियमांप्रमाणे वनक्षेत्र कसण्यासाठी मिळालेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वनक्षेत्रात अतिक्रमणे करु नयेत आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या सर्वच भागातील वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी सांगितले. 

Web Title: Action on encroachment of forest department in Baramati taluka