झोपडपट्ट्यांतील अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - पाटील इस्टेटजवळील झोपडपट्टीला आग लागल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने या परिसरासह वेगवेगळ्या भागांतील झोपडपट्ट्यांलगतची अतिक्रमणांवर हातोडा उगारला आहे. जुन्या पुणे-मुंबई मार्गासह पाटील इस्टेट आणि महात्मा गांधी वसाहतीशेजारील दुकाने, स्टॉल  आणि अन्य प्रकारच्या अतिक्रमणांवर यानिमित्ताने कारवाई करण्यात आली.  ज्या भागांत झोपडपट्ट्या आहेत, तेथील चौक आणि रस्ते मोकळे करण्यात येणार असून, ही कारवाई नियमित होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहराच्या विविध भागांतील झोपडपट्टयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. विशेषत: दुकाने आणि स्टॉल थाटण्यात आली आहेत. शिवाय सकाळी आणि सायंकाळी हातगाड्या आणि पथारी व्यवसायिक बसतात. तसेच, प्रमुख रस्त्यांवर वाहने लावली  जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून आले 
आहे. अशा अतिक्रमणांमुळे दुर्घटनेदरम्यान अडचणी येत असल्याचे आढळून आले.

संगमवाडी येथील पाटील इस्टेटजवळील झोपडपट्टीला आग लागली तेव्हा जुना पुणे-मुंबई मार्गावरील अतिक्रमणांमुळे अग्निशामक दलाचे बंब आणि टॅंकर घटनास्थळी पोचण्यास खूपच  उशीर झाला. त्याबाबत अग्निशामक दलाने अतिक्रमण विभागाकडे 
तक्रार केली. या घटनेनंतर झोपडपट्ट्यांच्या आजूबाजूच्या अतिक्रमणांचा विषय गंभीर झाला आहे. त्यानंतर डोळे उघडलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा भागांतील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरात सर्वत्र अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. प्रमुख रस्त्यांलगतच्या घोषित आणि अघोषित झोपडपट्ट्यांच्या परिसरातील बेकायदा झोपड्या, स्टॉल आणि दुकाने काढण्यात येत आहेत. सर्व भागांतील झोपडपट्ट्यांची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी पथके नेमली आहेत.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग

वीजवाहिन्या भूमिगत करा
झोपडपट्ट्यांच्या भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. झोपडपट्ट्यांमधील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या नाहीत.  येथील रहिवाशांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटील इस्टेटमध्येही झोपड्यांच्या छतापासून दोन-तीन फुटांवर वाहिन्या आहेत. शहरातील बहुतांशी भागात वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या असल्या, तरी झोपडपट्यांमधील वाहिन्या उघड्या असल्याने रहिवाशांनाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन दिवसांपूर्वी आगीच्या घटनेतही वाहिन्यांचा धोका दिसून आला. या वसाहतीमध्ये पाच दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी रहिवाशांची आहे.

Web Title: Action on encroachment of patil estate slums aera