पुणे - जुनी सांगवी, पिंपळे गुरव येथे पालिकेची अतिक्रमण कारवाई 

रमेश मोरे
शुक्रवार, 11 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. जुनी सांगवी येथील नवी सांगवी, सांगवी फाटा याकडे जाणाऱ्या गंगानगर महाराणा प्रताप चौकातील चौक रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. जुनी सांगवी येथील नवी सांगवी, सांगवी फाटा याकडे जाणाऱ्या गंगानगर महाराणा प्रताप चौकातील चौक रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागाचे अभियंता मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबी मशीन व मोठ्या पोलिस बंदोबस्तासह पिंपळे गुरव व जुनी सांगवीत ही रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पत्राशेड व ओटा बांधकाम अतिक्रमण विभागाकडुन काढण्यात आले. सुरवातीला येथील रहिवाशी नागरीकांनी पालिका अधिकाऱ्यांशी कारवाई करू नये म्हणुन गळ घातली.कागदपत्रांची तपासणी व चर्चेनंतर पत्राशेडवर कारवाई करून उर्वरीत बाधीत पत्राशेड स्वत: काढुन घेण्याच्या तोंडी विनंतीवरून प्रशासनाने ही कारवाई तुर्तास थांबवली आहे.

तर गेली पंधरा वर्षापासुन पिंपळे गुरव स.नं.५०/५१ या भागातील रखडलेल़्या रस्ता विकासकामात काही नागरीकांच्या तक्रारी व अडथळा होता.परंतु प्रमाणपत्र "ब" द्वारे नागरीकांनी अडथळा ठरणा-या जागा लिहुन देत या रस्त्यास  मान्यता दिल्याने गेली पंधरा वर्षापासुन रखडलेला हा रस्ता होण्याच्या कामास मार्ग मोकळा झाला आहे. मनपा शाळा पिंपळे गुरव ते काटेपुरम चौक मयुरनगरी हा साधारण पंधराशे मिटर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम होणार आहे. यात भुमीगत गटार, पावसाळी पाण्याचे नियोजन, पदपथ, मैला वाहिन्या, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अशा कामांचा समावेश आहे. एकुण अंदाजे १० कोटी खर्चाच्या या कामास पालिका स्थापत्य विभागाकडुन सुरूवात करण्यात आली आहे. तर जुनी सांगवी गंगानगर महाराणा प्रताप चौकातील पत्राशेडवर कारवाई करून हटविण्यात आले.

पिंपळे गुरव स.नं.५० व ५१ येथील रस्ता गेली पंधरा वर्षापासुन रखडला होता.नागरीकांच्या मान्यतेने येथील अडथळा दुर करून कामास सुरूवात करण्यात आली.याचबरोबर श्री.मनोज सेठिया वरिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी सांगवी येथील गंगानगर चौकात अडथळा ठरणाऱ्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
- शिरिष पोरेडी अभियंता स्थापत्य "ह" प्रभाग.

आमच्याकडे रितसर कागदपत्रे असताना केवळ राजकीय दबावामुळे आमच्यावर कारवाई झाली.
- विजय वाघचौरे, रहिवाशी

Web Title: action on encroachment in sangavi and pimple gurav in pune