खडकीत अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पुणे ः खडकी बाजार परिसरास पडलेला अतिक्रमणांचा विळखा हटविण्यासाठी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाने अनोखा उपाय योजला आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी बोर्डाच्या अग्निशमन दलाची गाडी सायरन वाजवत बाजारात फिरताना सध्या दिसत आहे. अग्निशमन दलाच्या गाडीपुढे अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी रस्त्यामध्ये येणारी अतिक्रमणे दूर करीत अग्निशमन गाडीला रस्ता करून देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाने कडक पावले उचललेली आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी बोर्डाच्या अतिक्रमण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाडीला या रस्त्यावरून सहज जाता आले पाहिजे, यासाठी सध्या ही गाडी दररोज बाजारात फिरताना दिसत आहे. दरम्यान, सायरन वाजवणारी अग्निशमनची गाडी बघून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिक्रमणे हटविण्याचा असा उपाय योग्य ठरेल का? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. 

""बोर्डाकडून दररोज अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. मात्र, अतिक्रमणाची गाडी निघून गेली, की पुन्हा अतिक्रमणे करण्यास सुरवात होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्त्वावर सध्या अग्निशमन दलाच्या गाडीला जाण्याइतपत रस्ता मोकळा आहे का, हे पाहण्यासाठी बाजारातील सगळ्या रस्त्यावरून या गाडीची फेरी गेली दहा दिवसांपासून फिरवत आहोत. मात्र, तरीही अतिक्रमणे कमी झाली नाहीत, तर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on encrocachment in Khadhki