जीएसटी थकबाकीदारांवर कारवाई 

सुधीर साबळे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

केंद्र सरकारने जीएसटी कर लागू करून सव्वा वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. व्यावसायिक आणि उद्योगांनी कराचा भरणा वेळेत करावा, यासाठी सातत्याने विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात आले. मात्र, काही व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून जीएसटीची रक्‍कम थकीत ठेवली आहे, त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्याकडेही या व्यावसायिकांनी दुर्लक्ष करून, ही रक्‍कम भरली नाही. त्यामध्ये पिंपरी- चिंचवड व तळेगाव परिसरातील तीन हजार 670, भोसरीतील 938 आणि चाकणमधील एक हजार 760 व्यावसायिकांचा समावेश आहे, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर विभागातील सूत्रांनी "सकाळ'ला दिली. 

सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ जीएसटी कराची रक्‍कम न भरणाऱ्या व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर वस्तू आणि सेवा कर कायद्यातील कलम 132 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये थकीत कराच्या रकमेवर दंड लावण्यात येणार असून, यामध्ये अटक करून तुरुंगात टाकण्याचीही तरतूद आहे. 

""जीएसटी न भरलेल्यांची अंतिम यादी तयार झाली आहे. या थकबाकीदारांवर या महिन्यापासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर थकीत रकमेची वसुलीही करण्यात येईल.'' 
- अमित नायक, साहाय्यक आयुक्‍त आणि नोडल ऑफिसर, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग 

आकडे बोलतात  
ठिकाण बजावलेल्या नोटिसा जमा झालेला कर 
तळेगाव 3,800 19 कोटी रुपये 
पिंपरी 3,700 6.50 कोटी रुपये 
भोसरी 2,260 0.09 लाख रुपये 
चाकण 2,500 7 कोटी रुपये 

Web Title: Action on GST defaulters