पुणे बंगळुर महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाईस सुरुवात

Action on heavy vehicles started on Pune-Bangalore highway
Action on heavy vehicles started on Pune-Bangalore highway

नसरापूर : मुंबई-पुणे-बंगळुर या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांकडून नियमांचे काटेकर पालन होणे आवश्यक आहे. यासाठी महामार्ग वाहतूक विभागाकडून नियम मो़डून लेनची शिस्त न पाळणारया वाहन चालकांवर आता करडी नजर ठेवणार  आहे. लेन कटिंग केल्यास दंड आकारणा असून, तीनवेळा कारवाई झाल्यास चालकाचा परवाना रद्द करण्याची करणार आहे. या कारवाईस महामार्गावर आजपासुन सुरुवात झाली.

राज्याचे गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांच्या सुचने नुसार राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक वाहतुक शाखा भुषणकुमार उपाध्याय व महामार्ग पोलिस अधिक्षक पुणे संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून ''आँपरेशन आँन हायवे सेफ्टी'' हा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून महामार्गावर वाहतुकीचे नियम तोडून वाहतूक करणारया वाहन चालकांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

शेतकऱ्याच्या घरी जेवण, विवेकानंद-खुदीराम बोसना श्रद्धांजली; बंगाली अस्मितेला...

महामार्ग वाहतुक शाखा सारोळा पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण रणदिवे यांनी याबाबत माहीती देताना सांगितले कि, मुंबई-पुणे-बंगळुर या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण पाहता वाहन चालकांकडुन सर्रास वाहतुक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते तसेच अवजड वाहनांसाठी असलेल्या लेनचा वापर अवजड वाहने करत नसल्याने इतर वाहनांच्या लेनची शिस्त बिघडते आहे व त्यामुळे देखिल वाहतुक कोंडी किंवा अपघात होत आहेत यावर आळा घालण्यासाठी आज पासुन थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली असुन लेनची शिस्त न पाळणारया अवजड वाहनांवर त्वरीत दंड करण्यात येणार आहे व या मोहीमे अंतर्गत सलग तिसरयांदा कारवाई झाल्यास त्या वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे अशी माहीती त्यांनी दिली.
आज पासुन सुरु झालेल्या या कारवाई मध्ये दिवसभरात ११७ वाहनांवर  कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी २०० दंड करण्यात आला असुन वाहन चालकांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत
 

आदिवासी भागातील युवकांचा स्तुत्य उपक्रम; कडधान्ये बियाणे बँक केली सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com