
तुमच्याकडून रक्तपेढ्यांनी निश्चित केल्यापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याची तक्रार तुम्ही थेट आरोग्य खात्याकडे करू शकता. इतकेच नव्हे तर जादा आकारलेले शुल्कही तुम्हाला परत मिळेल, अशी तरतूद असलेला निर्णय सरकारने घेतला आहे.
पुणे - तुमच्याकडून रक्तपेढ्यांनी निश्चित केल्यापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याची तक्रार तुम्ही थेट आरोग्य खात्याकडे करू शकता. इतकेच नव्हे तर जादा आकारलेले शुल्कही तुम्हाला परत मिळेल, अशी तरतूद असलेला निर्णय सरकारने घेतला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यामधील रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत होत्या. विशेषतः थॅलेसीमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क वसूल करणे, संकेतस्थळावर दररोजचा रक्तसाठा न दर्शविणे तसेच, प्लाझ्मासाठी निश्चित केल्यापेक्षा जास्त रक्कम आकारल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
सद्यःस्थितीत रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निश्चित तरतूद नव्हती. त्याचवेळी सक्षम अधिकाऱ्यांना त्याबाबतचे अधिकारही नव्हते. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने दोन वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाचा आधार घेतला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी
रक्त व प्लाझ्मा प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खासगी रक्तेपढ्यांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार देण्यात आला आहे. करवाई करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित केल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पुणेकर थंडीने गारठले!; किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसची नोंद
...तर परवाना रद्द
करवाईपूर्वी रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणार आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही सातत्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तेपढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल, असेही यात स्पष्टपणे नमूद केले आहे.
Edited By - Prashant Patil