खराडी मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई | Crime on Construction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खराडी मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई
खराडी मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

खराडी मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने खराडी आणि लोहगाव परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत खराडी येथील सर्वे क्रमांक 14 भागात एका चार मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आठ हजार पाचशे चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले.

दोन जेसीबी, दोन ब्रेकर, एक गॅस कटर, दहा बिगारी, दहा पोलिस कर्मचारी यांच्या साह्याने प्रभारी कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता निखिल गुलेछा, प्रतीक पाथरकर, यांनी कारवाई केली. सदरच्या बांधकामाला दोन महिन्यांपूर्वी नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती कनिष्ठ अभियंता गुलेछा यांनी सकाळला दिली.

loading image
go to top