पुण्यातील हवेच्या गुणवत्तेसाठी कृती आराखडा

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 11 जुलै 2018

नागपूर - पुण्यातील सार्वजनिक व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्याचे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले. याबाबत अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना केली होती. पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा केल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील वायू प्रदूषण वाढल्यामुळे लहान मुलांच्या आजारपणात वाढ झाल्याचा मुद्दा गाडगीळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. ते म्हणाले, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात ८५० प्रदूषित शहरांमध्ये देशातील १४ शहरांचा समावेश आहे. त्यात प्रथम क्रमांकावर वाराणसी, तर तिसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. वाढती वाहने, बांधकामाचा राडारोडा व कचरा, प्लॅस्टिक यामुळे प्रदूषण वाढत आहे. तरंगते धुलीकण (आरएसपीएम), नायट्रोजन डायऑक्‍साइड (एनओएक्‍स) या घटकांत वाढ झाली. वाढत्या वायू प्रदूषण पातळीमुळे श्‍वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. लहान मुलांतील रुग्ण संख्या २० टक्‍क्‍यांनी वाढली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवली पाहिजे. भाजप आमदारांनी दिलेली बसगाडी पीएमपीएमएलने स्वीकारली; पण मी आमदार निधीतून दिलेली गाडी नाकारली. कचरा प्रश्‍न चार वर्षांत सोडविता आला नाही.’’ 

दरम्यान, आमदारांना कृती आराखडा मिळाला नसल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी उत्तर देण्यास सुरवात केली. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व विरोधकांनी हरकत घेतली व गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर रामदास कदम म्हणाले, ‘‘कृती आराखड्यात २७ मुद्दे आहेत. शहरातील कचऱ्याची समस्या जुनी आहे. मात्र, पुण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

काय आहेत उपाययोजना
 अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते
 डिझेलमधील सल्फर कमी करणे
 सीएनजीचा वापर वाढविणे
 जुन्या बसगाड्या बाद करणे
 इलेक्‍ट्रिक बसगाड्यांचा वापर

Web Title: Action plan for air quality in Pune