बेकायदा उत्खननाला बसणार आळा; चार विभागातील अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई सुरू

Illegal_mineral_mining
Illegal_mineral_mining

पुणे : कोरोनावर उपाययोजना करण्यात प्रशासन व्यस्त असताना लॉकडाउनच्या कालावधीत बेकायदा उत्खननाचे प्रमाण वाढले आहे. हे बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 'ऍक्‍शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. महसूल विभागासह पोलिस, वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त पथकांद्वारे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्हा प्रशासनातील खनिकर्म विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. संबंधित विभागाची एकत्रित मदत घेऊन ही कारवाई करण्यात येणार आहे. 

अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये महसूल विभागाबरोबरच पोलिस, वन आणि आरटीओ विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. ज्या भागात बेकायदा उत्खनन सुरू आहे, अशा भागाची पाहणी करून संयुक्‍त कारवाई करण्यात येईल. त्यामुळे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. 

वाळू तस्करांच्या 24 यांत्रिक बोटी उध्वस्त 
जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात बोटींद्वारे बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार दौंडमधील शिरपूर येथे 13 बोटी आणि धुमाळ फाटा, आलेगाव आणि देवळगाव या ठिकाणी 11 बोटी ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व 24 बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. बेकायदा उत्खनन आणि वाळू चोरींचे प्रकार घडू नयेत, यासाठी या पथकांकडून कारवाई सुरू राहील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com