सिंहगड रस्ता परिसरात पाच मजली इमारती जमीनदोस्त; पालिकेची कारवाई

सिंहगड रस्ता परिसरात पाच मजली इमारती जमीनदोस्त; पालिकेची कारवाई

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील महापालिका हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दोन पाच मजली इमारती अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत जमिनदोस्त केल्या. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

महानगरपालिका हद्दीमधील वडगाव बुद्रुक क्षेत्रातील सर्वे नंबर 45 मध्ये बिडीपी आरक्षण आहे. या क्षेत्रावर बांधकाम करण्यास पुणे मनपा मार्फत परवानगी देण्यात येत नाही. या भागात नागरिकांनी अनाधिकृत बांधकामे केलेली आहेत. या बांधकामांना नोटिसा देऊन आज (ता. 24) रोजी कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पुणे मनपा बांधकाम विभाग झोन क्र.२ पथकाने ज्वा कटर मशिन, जेसीबी, बिगारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी व स्थानिक पोलिस अधिकारी यांचे सहकार्याने पार पाडली. कारवाई दरम्यान 2 बहुमजली इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच प्लींथ लेव्हल मधील 1 बांधकाम पाडण्यात करण्यात आले. असे एकूण 16000 चौ फूट आरसीसी पक्के बांधकाम पाडण्यात आले.

सदर कारवाई बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचे नियंत्रणाखाली झोन क्र. 2 चे कार्यकारी अभियंता नामदेव गंभिरे, उपअभियंता राहुल साळुंखे, प्रताप धायगुडे, कैलास कराळे व सर्व कनिष्ठ अभियंते यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर कारवाईसाठी सनसिटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास घेवारे , सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे  व इतर अधिकारी उपस्थित होता.

बिडीपी आरक्षणात कोणतीही बांधकाम करू नयेत तसेच निवासी भागातही पुणे मनपाची परवानगी घेऊनच बांधकामे करावीत असे आवाहन पुणे मनपा प्रशसना मार्फत करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन इमारतींवर कारवाई.. इतरांचे काय?... सिंहगड रस्ता परिसरात पुणे महानगरपालिका हद्दीत वडगाव धबाडी, धायरी तसेच इतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली मात्र इतर अनधिकृत इमारतींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com