#PuneTraffic बेशिस्‍त वाहनचालकांवर कारवाई हवीच

#PuneTraffic बेशिस्‍त वाहनचालकांवर कारवाई हवीच

पोलिस
वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. तरच चालकांमधील बेशिस्त कमी होईल. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे. अन्यथा भविष्यात कोंडीची समस्या तीव्र होईल.
- गणेश पुजारी  

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली आहे. पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिका कारवाई करीत नाही. वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत नाही. 
-विजयकुमार रांका 

नगर-पुणे रस्त्याने माझा नेहमीचा प्रवास आहे. नगरवरून जेवढा वेळ मला वाघोलीला येण्यासाठी लागतो, तेवढाच वेळ मला वाघोलीवरून डेक्कनला येण्यासाठी लागतो. बेशिस्त वाहतुकीकडे पोलिस दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी कोंडी होत असते. 
- अजिंक्‍य शेवाळे 
 
शहरात सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी साडेचार ते रात्री साडेआठ या वेळेत पोलिसांनी चौकात उभे राहून वाहतूक नियमन करावे. या वेळेत कारवाईपेक्षा वाहतूक नियमनाला महत्त्व द्यावे. 
- अरुण बंडी  

अनधिकृत पार्किंग
बाजीराव रस्त्यावर असलेल्या दुकांनाची अधिकृत पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालक रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी करतात. या रस्त्यावरील दोन्ही बाजूला पार्किंगसाठी मनाई करावी.- अश्‍विनी साने 

अतिक्रमणे
दीप बंगला चौक ते जनवाडीपर्यंतचा रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमणे वाढली आहेत.  रस्त्याच्या कडेलाही काहींनी दुकाने थाटली आहेत. 
- योगेश धावडे 

सर्व्हे समिती
 पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक समिती असावी. ही समिती एक महिना सर्वे करेल व त्यानंतर मग खड्डे कसे बुजजावे, पोलिसांनी काय करावे, सिंग्नल कसे असावे, झेब्रा क्रॉसिंगचे काय नियोजन करावे, नागरिकांनी काय करावे, दंड किती असावा, ह्या मुद्यांवर चर्चा करता येईल.
- परमेश्वर इंगळे 

अंतर्गत रस्ते
वाघोलीमधील वाहतूक कोंडीसाठी अंतर्गत रस्तेसुद्धा कारणीभूत आहेत. ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्ते जर दुरुस्त केले, तर बरीचशी वाहतूक नगर रस्त्यावर न येता या मार्गाचा अवलंब करतील आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्याय ठरेल.
- महेश गाढे

अरुंद रस्ता
रेंजहिल्समधून शिवाजीनगरला जातानाचा रस्ता अरुंद आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे अधिक त्रास होतो. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी होते. 
- प्रथमेश खारगे 

पुण्यात काही वर्षांपूर्वी दुपारी १२ नंतर रस्त्यांवर तुरळक गर्दी असायची; परंतु गेल्या १० वर्षांमध्ये इतकी वाहने वाढली आहेत, की त्यांचे रूपांतर वाहतूक कोंडीमध्ये झाली आहे. नुकतेच पुणे हे सुरक्षित शहर घोषित झाले असल्याने आता यापुढे तर अजूनच लोकांचे पुण्यात येण्याचे प्रमाण वाढेल. यावर नक्कीच प्रशासनाने सार्वजानिक वाहतुकीची योग्य सोय करणे अपेक्षित आहे. नाही तर स्थानिक नागरिकांना पायी चालणेही अवघड होईल. 
-गीता मोहोरकर

वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, जर वाहन खरेदीदाराचे मालकीचे पार्किंग नसेल तर नवीन तीन, चारचाकी गाड्याची विक्री थांबवण्याची गरज आहे.  कारण व्यावसायिक/पिवळे प्लेट असलेली वाहने रोज रस्त्याच्या कडेला किंवा इमारतीच्या बाहेर पार्क केलेले दिसतात. 
- धीरज  

सायकल, शेअर रिक्षा, सहप्रवासी सहकार्य, सार्वजनिक वाहतूक पुण्यातील सार्वजनिक वाहतूक ही हेतुपुरस्सर अपूर्ण व गैरसोयीची ठेवली आहे, हे सर्व पुणेकर जाणतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, सायकलचा वापर करणे, शेअर रिक्षाला प्रोत्साहन देणे, रोज एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी सहप्रवासी सहकार्य करावे, यांसारखे काही उपाय अमलात आणले, तर अजूनही पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवता येऊ शकते. 
 - शेखर तपस्वी 

कोंडी 
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्यांनी गर्दीनुसार त्यांचे वेळापत्रक करण्याची गरज आहे. म्हणजे एकाच वेळी रस्त्यावर वाहने वाढणार नाहीत.
- नवनाथ बालवडकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com