लाखभर फुकट्य़ा प्रवाशांवर रेल्वेची कारवाई; पावणे 6 कोंटीचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

 रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर भागात तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यात विभागामध्ये एकूण 2 लाख 19 हजार 647 प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने 11 कोटी 55 लाख रुपयांचा दंड वसूल केला. त्यामध्ये 99 हजार 829 प्रवाशी हे विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात 5 कोटी 73 लाख रुपये वसूल करण्यात आले.

पुणे : रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अभियान राबविले आहे. या अभियानाअंतर्गत मागील सात महिन्यात पुणे विभागामध्ये सुमारे 1 लाख विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तर त्यांच्याकडून सुमारे 5 कोटी 73 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15 टक्‍क्‍यांनी विना तिकीट करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली.

 रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर भागात तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यात विभागामध्ये एकूण 2 लाख 19 हजार 647 प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने 11 कोटी 55 लाख रुपयांचा दंड वसूल केला. त्यामध्ये 99 हजार 829 प्रवाशी हे विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात 5 कोटी 73 लाख रुपये वसूल करण्यात आले.

दरम्यान, गेल्यावर्षी याच कालावधीत 1 लाख 94 घटनांमध्ये 9 कोटी 33 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तर 87 हजार प्रवाशांना विना तिकीट करताना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून 4 कोटी 77 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत विना तिकीट करणाऱ्या प्रवाशांमध्ये 14.67 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ही कारवाई पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली, असे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken against passengers traveling by train without a ticket