कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढती अतिक्रमणे यामुळे वाहनचालक नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता.
Crime on Encroachment
Crime on EncroachmentSakal
Summary

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढती अतिक्रमणे यामुळे वाहनचालक नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता.

कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढती अतिक्रमणे यामुळे वाहनचालक नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता. यानंतर सकाळने सातत्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अतिक्रमण कारवाई करत ३.५ लक्ष चौरस फूट जागा अतिक्रमण मुक्त केली आहे.

मुळात अरुंद असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणांनी घातलेला विळखा महापालिका बांधकाम विकास झोन दोनच्या वतीने धडक कारवाई करत काढण्यात आला. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला असून अतिक्रमणे काढलेल्या रस्त्यावर तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. अन्यथा पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमणे व्हायला वेळ लागणार नाही.

महापालिका बांधकाम विकास विभाग झोन २, अतिक्रमण, पथ, आकाशचिन्ह विभागाने ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तात करण्यात आली. चार जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ब्रेकर व ४० कर्मचाऱ्यांच्या मदतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे, उपअभियंता प्रताप धायगुडे, शाखा अभियंता प्रशांत मोरे, हेमंत कोळेकर, अभिजित भुजबळ, संदेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, अतिक्रमण काढण्यास जागा मालकांकडून घोषणांबाजी करत विरोध करण्यात आला होता. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांनी हा विरोध मोडून काढत कारवाईसाठी होणारा अडथळा दूर केला.

प्रतिक्रिया

८४ मीटरच्या प्रस्तावित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. पक्या स्वरूपातील निवासी मिळकती यांना शासन नियमाप्रमाणे मोबदला देऊन ताबा घेऊन बांधकामे काढली जातील. दर आठवड्याला नियमित कारवाई होणार आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या क्षेत्रावर पुन्हा अतिक्रमणे करू नयेत.

- राहुल साळुंखे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com