esakal | परस्पर रेमडेसिव्हिर आणण्यास सांगितले तर कारवाई!

बोलून बातमी शोधा

Action taken if buy remdesivir without doctor consent
परस्पर रेमडेसिव्हिर आणण्यास सांगितले तर कारवाई!
sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसिवीर आणण्यास सांगणाऱ्या व्यक्तींसह कोविड सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिला आहे. डॉ.कोल्हे यांनी गुरुवार (ता.२९) आमदार अतुल बेनके यांच्यासह जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी, लेण्याद्री, शिरोली बुद्रुक, ओझर आणि आळे येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थानचे सचिव जितेंद्र बिडवई, आशा बुचके, देवराम लांडे, भाऊ देवाडे, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश आगम,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे तसेच सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: कोरोना होऊन गेलेल्या तरुणांनी लस घ्यावी का?

जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती वैभव सदाकाळ यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून लेण्याद्री कोविड केअर सेंटरसाठी पाच हजार रुपयांची मदत केली. आज खासदर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धनादेश जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे सुपूर्द केला

कोरोना सेंटर मधील दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी वैद्यकीय उपचार,जेवण आणि अन्य सुविधांबद्दल संवाद साधला.कोविड सेंटरवर सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.)

हेही वाचा: अमेरिकेतील भारतीयांकडून ४७ लाख डॉलरचा निधी

डॉ.कोल्हे म्हणाले, ''कोविड टास्क फोर्सची नियमावली प्रत्येक कोविड केअर सेंटरच्या बाहेर सूचना फलकावर लावावी. रेमडीसिवीर इंजेक्शनचे योग्य त्या रुग्णांस वाटप करण्यात यावे. प्रत्येक कोविड सेंटरची नोंदणी तालुका डॅश बोर्डवर नोंद ठेवावी. कोविड हेल्पलाईन नंबर २४ तास कार्यरत ठेवावा.मध्यंतरी ऑक्सिजन कमतरता भासत होती पण आता त्यात सुधारणा होत आहे.लवकरच पुरवठा सुरळीत होईल.''

कोविड केअर सेंटरवरील कुशल मनुष्य बळाबाबत ते म्हणाले, “ कोविड सेंटर मधील कुशल मनुष्यबळाची कमतरता याचा सविस्तर तपशील द्यावा. त्याबाबत पाठपुरावा करून उपलब्धता करण्याबाबत आरोग्य विभाग व जिल्हा कोविड यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन” असे आश्वासन त्यांनी दिले.''

हेही वाचा: लस घेतल्यास मृत्यूची शक्यता 0.00005 टक्के!