तळेगाव पोलिसांकडून हातभट्ट्यांवर कारवाई

liquor
liquor

तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (ता.११) सायंकाळी शिरगाव परिसरातील पवना नदी काठच्या तीन हातभट्टयांवर केलेल्या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किंमतीचा ५ हजार लिटरपेक्षा अधिक कच्चामाल जप्त करून, चार महीलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

नव्यानेच रूजू झालेले तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे गुन्हे, शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण पवार पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, वैभव सोनवणे यांच्यासह पुरुष आणि महिला पोलिसांच्या १५ जणांच्या पथकाने सोमवारी (ता.११) सायंकाळी केलेल्या मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात धडक कारवाई केली. जवळपास तीन तासांहून अधिक चाललेल्या कारवाईत पोलिसांनी शिरगावजवळील पवना नदीकाठच्या कंजारभाट वस्तीवरील कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने तीन हातभट्ट्या आणि गावठी दारु बनवण्याचे साहीत्य नष्ट करुन भट्टया उद्ध्वस्त करण्यात आल्या. 

पो.ह.बंडू मारणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी कुंदन प्रकाश नानावत, अलका कुंदन नानावत, अकबर गुलाबसिंग मनावत, पुनम अकबर मनावत, हमराज नटवरसिंग राजपुत, मर्जीना हमराज राजपुत, पारी ईश्वर राजपुत अशा तीन दांम्मत्यांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी तीन पुरुष आरोपींना पोलिसांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. कारवाई दरम्यान घेतलेले रसातनाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत.

पोलिसांची कारवाई राज्य उत्पादन शुल्क गप्प का?
तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेकायदा हातभट्टयांवर कारवाई केली केली. तळेगाव एमआयडीसीसह चाकण रस्त्यावर सर्रास बेकायदा दारु विक्री चालू आहे. मात्र, मावळसह खेड तालुक्यात गावठी, बेकायदा, बनावट दारुची चढ्या दराने राजरोस विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क तळेगाव विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ का? असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com