फौजदारी कारवाईचे आश्‍वासन विरले हवेत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंढवा - केशवनगर परिसरातील कडबाकुट्टी परिसरात महापालिकेने अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली होती. त्या वेळी पुन्हा अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. या भागामध्ये अनेकांनी पुन्हा अनधिकृत नळजोड जोडले असून, अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्‍वासन हवेत विरले आहे.

शिवाजी चौक ते कडबाकुट्टी दरम्यानच्या रस्त्यावर महापालिकेने कुंभारवाड्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली होती. या वहिनीतून परिसरातील रहिवाशांनी अनधिकृत नळजोड घेतले होते. लष्कर पाणीपुरवठा विभागाने गेल्या २  जून रोजी त्यावर कारवाई करून ३१ अनधिकृत नळजोड तोडले होते. मात्र त्यानंतर महिना उलटत नाही, तोच पुन्हा मालमत्ताधारकांनी एक इंची अनधिकृत नळजोड जोडले आहेत. कारवाई करताना पुन्हा अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता इंद्रजित रणदिवे यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र होताना दिसत नाही. यामुळे अधिकाऱ्यांचे कारवाईबाबतचे बोलणे आता हवेत विरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी केवळ धाक न दाखवता फौजदारी कारवाईची मागणी होत आहे. 

गेल्या महिन्यात पाणीपुरवठा विभागाने कुंभारवाड्याच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोड तोडले होते. पुन्हा नळजोड घेतले असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-इंद्रजित रणदिवे, कनिष्ठ अभियंता,  लष्कर पुरवठा विभाग

Web Title: Action on Unauthorized water connection

टॅग्स