पुणे जिल्ह्यातील दादा, भाई, भाऊंनो तुमचे चंबुगबाळे आवरा, कारण...

जनार्दन दांडगे
Wednesday, 21 October 2020

पोलिसांच्याकडून गुन्हेगारांची कुंडली मिळताच, पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अशा विविध प्रकारच्या कारयाई सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांच्याकडून मिळाले आहेत.

लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माफियांसह गावोगावी दादागिरी करणाऱ्या फळकुट दादांनो आपले चंबुगबाळे आवरुन तयार रहा...कारण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार, दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच गुन्हेगारांची कुंडली तयार कऱण्याचे काम पोलिस स्टेशन निहाय ऑलरेडी सुरु झाले आहे. पोलिसांच्याकडून गुन्हेगारांची कुंडली मिळताच, पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अशा विविध प्रकारच्या कारयाई सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांच्याकडून मिळाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा (ग्रामिण) पोलिस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्यासमवेत रविवारी झालेल्या बैठकीत, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील लॅंड, सॅण्ड माफिया बरोबरच, ग्रामिण भागात वारंवार छोटे-मोठे गुन्हे करणाऱे सराईत गुन्हेगार, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची यादी व गुन्ह्यांची माहिती तयार कऱण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्याकडून आपआपल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी व गुन्ह्यांची माहिती मिळताच, यातूनच पोलिस स्टेशननिहाय टॉप टेन गुन्हेगारांच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अशा विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले असल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १८) दिवसभर जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकारी व सर्वच पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशी संयुक्त बैठक पोलिस मुख्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी गावपातळीवर वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या बरोबरच, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची कुंडली तयार करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. यातुन पोलिस स्टेशननिहाय टॉप टेन गुन्हेगार ठरवून, टॉप टेन गुन्हेगारांच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अशा विविध प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिस दलातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात माफियांबरोबरच, ग्रामिण भागात वारंवार छोटे-मोठे गुन्हे करणाऱे सराईत गुन्हेगार, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती सादर करण्याची सुचना डॉ. देशमुख यांनी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच बरोबर मागिल वर्षभरात जुगार व मटक्याचे दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचीही माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांची माहिती तयार करताना, गुन्हेगाराचे नाव, पत्ता, मुळ गाव, दाखल झाल्याची गुन्ह्यांची संख्या व गुन्हांची सखोल माहितीचा समावेश असणार आहे. ही माहिती पुढील दहा दिवसांच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडे देण्याबाबतचा सुचनाही पोलिसांना दिलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसांतच जिल्हातील गुन्हेगारांची कुंडली तयार होऊन, अधिक्षक कार्यालयाला मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किमान आठ हजाराहून अधिक गुन्हेगारांची कुंडली होणार तयार... 
पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांचा रविवारी आदेश मिळताच, जिल्हातील ३३ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपआपल्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांची यादी तयार करताना, यादीमध्ये जास्तीत जास्त वेळेस गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचा समावेश पहिल्या टप्प्यात तर त्यानंतर इतर आरोपींचा समावेश दुसऱ्या टप्प्यातील य़ादीत केला जाणार आहे. यापुर्वीच पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या काळात सहा हजाराहून अधिक गुन्हेगारांच्यावर विविध प्रकारे कारवाई झालेल्या होत्या. संदीप पाटील यांच्या काळातील गुन्हेगारांच्या यादीत छोट्या-मोठ्या अशा दोन हजाराहून अधिक गुन्हेगारांची वाढ होऊ शकतो अशा विश्वास पोलिसांना आहे. 

...मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अंतर्गत कठोर कारवाई : डॉ. देशमुख

देशमुख म्हणाले, '' जिल्ह्यातील माफियांबरोबरच, ग्रामिण भागात वारंवार छोटे-मोठे गुन्हे करणाऱे सराईत गुन्हेगार, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची यादी व गुन्हांची माहिती तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे ही बाब खरी आहे. दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या जिल्हातील ३३ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी व गुन्ह्यांची माहिती पुढील काही दिवसांतच अधिक्षक कार्यालयाला मिळणार आहे. ही माहिती मिळताच, गुन्हेगारांच्या गुन्चीह्यां संख्या व गुन्हे यांची प्रतवारी करुन, पहिल्यांदा पोलिस स्टेशन निहाय गुन्हेगारांची टॉपटेन यादी बनविण्यात येणार आहे. त्यानंतर वरील आरोपींच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against criminals in Pune district under Mocca, MPDA, deportation says sp abhinav deshmukh