पुणे : विनाकारण रस्त्यावर फिरताय का?; मग आता...

crime.jpg
crime.jpg

पुणे : गल्लीबोळात मास्क न लावता विनाकारण फिरता आहात.. कोपऱ्यावर गर्दी करून गप्पा मारता आहात... तर सावधान अशा बेजबाबदार नागरिकांवर आता बोलणाऱ्या ड्रोनची नजर असणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर आता केवळ ड्रोनव्दारे  नजर राहणार नाही, तर या ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांमार्फत सूचनाही दिल्या जाणार आहे. त्यासाठी ड्रोनवर स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आवर घालण्यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विशेषत: प्रतिबंधित क्षेत्रात जागोजागी रस्ते बंद करूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अशा परिसरातील गांभीर्य नसलेल्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत आहे.

परंतु अनेकदा बेफिकिरीने वागणारे , रस्त्यावर गर्दी करणारे नागरिक दिसूनही रस्ते बंद असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्यास पोलिसांना अडचण येते. त्यावर उपाय म्हणून आता ड्रोनलाच स्पीकर्स बसून त्यांच्या माध्यमातून गर्दी करणारे, विनाकारण रस्त्यावर फिरणारे, मास्क न लावता बाहेर पडणाऱ्यांवर पोलिस सूचना देऊन नियमांचे पालन करण्यास भाग पडणार आहे. 

त्यासाठी दोन ड्रोनवर स्पीकर्स बसविण्यात आले आहे. ते प्रतिबंधित क्षेत्रातील विशेषतः. ताडीवाला रस्ता, भवानी पेठेतील कासेवाडी, लोहियानगर आदी भागात या बोलणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. असे काही प्रकार दिल्यानंतर तातडीने पोलिस या ड्रोनच्या माध्यमातून सूचना देत आहेत. पालन न करणाऱ्यांचे फोटो काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. 

त्याचबरोबरच प्रतिबंधित क्षेत्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस चौकीमध्ये यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून गरज पडल्यास नागरिकांना सूचना देणेही शक्‍य होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com