उत्सुकता पुन्हा टाळ्या-शिट्ट्यांची;अभिनेता भरत जाधव यांना विश्‍वास

bharat_jadhav
bharat_jadhav

पुणे - कोरोनाच्या काळात नाट्यगृहातील टाळ्या, शिट्ट्या बंद झाल्या होत्या. नऊ महिन्याच्या खंडानंतर आता नाटक पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पन्नास वर्षात एवढा मोठा खंड आम्ही कलाकारांनी पाहिला नव्हता. त्यामुळे पूर्वी एकांकिका सादरीकरणावेळी वाटणारी उत्सुकता आता नाटकांसाठी लागू राहिली आहे. या खंडाने खूप काही शिकविले आहे. त्यामुळे आता रंगमंचावर येणारे नाटक वेगळे असेल, असा विश्‍वास अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरत जाधव यांनी "सकाळ'च्या कार्यालयास भेट दिली. कोरोना, लॉकडाउन, सांस्कृतिक क्षेत्रावर झालेला परिणाम, कलाकारांच्या व्यथा आणि नव्याने सुरू झालेले नाटक या विषयावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला काही धडे दिले आहेत. आपण आतापर्यंत नुसते धावत होतो, प्रत्येकजण पैशांचा विचार करून पळत होता. पण आयुष्यात एक ठहराव आला आणि बरेच काही शिकवून गेला आहे. स्वच्छ राहा, छोट्या गोष्टीत आनंद शोधा, हा कोरोनाचा संदेश आहे. 

कलाकार म्हणून नऊ महिन्यांच्या काळात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, नवे वाचन झाले. विषयांकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली, नव्या प्रकल्पांविषयी चर्चा झाल्या, त्यात नवे प्रयोग आणता येतील का, याचा विचार झाला. त्यामुळे आता रंगमंचावर सादर होणारी नाटके ही रसिकांना वेगळी वाटतील. विषय फार बदलतील, असे नाही. पण सादरीकरणातील वैचारिक बैठक आणि शैली आणखी समृद्ध वाटेल, असा विश्‍वास भरत यांनी व्यक्त केला. 

Video : 'ऑनलाइन एज्युकेशन' आले लहान मुलांच्या डोळ्यावर!​

मोठ्या खंडानंतर नाटक सरू होणे खूप गरजेचे होते. त्यामुळे मी आणि प्रशांत दामले यांनी पुढाकार घेतला. एक व्हिडिओ बनवून रसिकांना आवाहन केले. रसिकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळतो आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. रसिकांमुळे नाटकांना यापुढील काळातही चांगले दिवस येतील. यामुळे पडद्यामागील कलाकारांनाही आर्थिक मदत होऊन त्यांच्या संसाराला हातभार लागेल, अशी भावना भरत यांनी व्यक्त केली. 

पुन्हा सही रे सही 
भरत जाधव यांच्या "पुन्हा सही रे सही' या नाटकाचे प्रयोग पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होत आहेत. शनिवारी (ता. 19), सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे, रविवारी (ता.20) कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी साडेबारा वाजता आणि रविवारीच (ता.20) सायंकाळी साडेसहा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com