प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरील कमेंटने सोशल मीडियावर खळबळ; नेटिझन्सकडून संताप

टीम-ई-सकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पुणे : चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरील एका कमेंटने सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे. प्रवीण तरडे यांच्याविरोधात नेटिझन्सकडून संताप व्यक्त केला जात असून तरडे यांच्या कमेंटवर अनेकांनी नकारार्थी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पत्रकार राजू परुळेकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून 'एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात, ठरवा' अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्या पोस्टवर प्रवीण तरडे यांनी संपूर्ण देश भाजपसोबत आहे, अशी कमेंट केली आहे. प्रवीण तरडे यांनी केलेल्या या कमेंटवर नेटिझन्सनी मात्र संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण देश जर भाजपसोबत असेल तर सीएएच्या विरोधात आंदोलन करणारे काय परगृहावरून आलेत काय? असा प्रश्नही नेटिझन्सनी कमेंटमध्ये विचारला आहे. 

Image may contain: text

तत्पूर्वी, नेटीझन्स आणि काही भाजपविरोधी कार्यकर्त्यांकडून प्रवीण तरडे यांना कॉल गेल्यावर आणि त्यांना ट्रोल केले गेल्यावर त्यांनी ही कमेंट डिलीट केली आहे. तरडे यांनी कमेंट डिलीट केल्यावर आता नेटिझन्स त्यांच्या वॉलवरील पोस्टमध्ये त्या कमेंटचे स्क्रीनशॉट शेअर करताना पाहायला मिळत आहेत. तसेच, त्यांच्या वॉलवरील पोस्टवर नकारार्थी कमेंट करताना दिसून येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor director pravin tarde controversial comment on social media huge reactions