भरत नाट्य मंदिर म्हणजे कलेचा पाणवठा - गिरीश कुलकर्णी

blind-actor
blind-actor

पुणे - ‘‘भरत नाट्य मंदिर हे पुण्यातील सामाजिक अभिसरणाचे केंद्र आहे. ‘भरत’ने कलेचा पाणवठा बहुजनांसाठी खुला केला. अशा या मंदिराचे नाव विश्‍वविख्यात व्हावे,’’ अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केली. 

भरत नाट्य मंदिराचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आणि रोटरी इंडियाच्या शतकपूर्ती निमित्ताने रोटरी डिस्ट्रिक्‍ट कल्चरल कमिटी आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्यातर्फे आयोजित ‘रस-भाव-रंजन नाट्य महोत्सवा’चे उद्‌घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी एअर चिफ मार्शल भूषण गोखले (निवृत्त), भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे, रोटरी डिस्ट्रिक्‍टचे रवी धोत्रे, संजय डोळे, रोटरी हिलसाइडचे अध्यक्ष उमेश नाईक उपस्थित होते.

सावी फाउंडेशनतर्फे तीस अंध कलाकारांनी सादर केलेल्या ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकाने महोत्सव सुरू झाला.   संस्थेशी मी जोडला गेलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. भूषण गोखले यांनी ‘अवघाची संसार’ या चित्रपटाचा एक किस्सा सांगून ‘या चित्रपटातील एका गीतात बागेत समोर बसलेल्या मुलांमध्ये मीही होतो; पण पुढे प्रत्यक्षात नाटक करण्याची संधी मिळाली नाही,’ असे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com