अभिनेत्री आयली घिया ‘फिट इंडिया ॲम्बेसिडर

Actress Ayli Ghiya
Actress Ayli Ghiya

पुणे - आरोग्यविषयक प्रश्‍नांवर जनजागृती करण्यात आघाडीवर असलेली युवा नृत्य कलावंत आणि चित्रपट अभिनेत्री आयली घियाची केंद्र सरकारच्या वतीने ‘फिट इंडिया ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन जणांची ‘फिट इंडिया’अंतर्गत निवड झाली असून, पुण्यातून निवड झालेली आयली ही एकमेव आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्‍या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ व स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (साई) वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण-तरुणींची निवड केली आहे. ही निवड एका वर्षासाठी आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ‘फिट इंडिया’ची मोहीम केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वत:ला आरोग्यसंपन्न ठेवावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

आयली ही डॉ. कविता आणि डॉ. प्रमोद घिया यांची मुलगी आहे. ती वेगवेगळ्या माध्यमातून आहार आणि व्यायामाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत असून, स्वास्थ्यविषयक जनजागृती करीत आहे. कोरोना काळात तिने समाज माध्यमावर ‘जर्नी टूवर्डस् हेल्दी लाईफ’ हा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील विविध डॉक्टरांबरोबर चर्चा करून जनसामान्यांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com