#SaathChal अभिनेत्री प्रियांका यादव यांचा  "साथ चल' उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने आयोजित "साथ चल' उपक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका यादव यांनी शनिवारी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकऱ्यांसमवेत डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन त्या संत तुकाराम महाराज पालखी समवेत पिंपरी-एच.ए.कॉलनी येथे सहभागी झाल्या. 

प्रियांका म्हणाली, "सकाळ'च्या या उपक्रमामुळे वारीमध्ये मी पहिल्यांदा सहभागी झाले. वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची ही संकल्पना खूप चांगली आहे. मला या उपक्रमात सहभागी झाल्याने आनंद वाटला. लहानपणापासून आई-वडील आपल्यासाठी खूप काही करीत असतात. त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. आई-वडिलांना प्रेम, जिव्हाळा देणे आवश्‍यक आहे.'' 

Web Title: actress priyanka yadav participate in sath chal