'आईच्या संस्कारांमुळे वागण्याचे भान '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पुणे - ""व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यात त्याच्या आईच्या संस्कारांचा मोठा वाटा असतो. लहानपणापासून आईने चालता-बोलता दिलेल्या आयुष्याच्या धड्यांमुळेच कठीणवेळी आपण कसे वागावे, याचे भान आपणास मिळत असते,'' असे मत अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. 

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्‍यामची आई फाउंडेशनचा "आदर्श आई' पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या गिरिजा आनंद सप्रे यांना बांदेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी "रंगत-संगत'चे ऍड. प्रमोद आडकर, फाउंडेशनचे प्रमुख भारत देसडला, सचिन इटकर उपस्थित होते. 

बांदेकर म्हणाले, ""होम मिनिस्टर' हा कार्यक्रम यशस्वी झाला. कारण मला महाराष्ट्रातील कुटुंबांचा विश्वास संपादन करता आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला महाराष्ट्रातील माता-भगिनींचे मन वाचता आले. त्यांना आनंदाचे दोन क्षण देता आले. हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.'' सप्रे म्हणाल्या, ""हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबीयांना समर्पित करते. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले म्हणून हे कार्य उभे करू शकले.'' प्रज्ञा गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. 

ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भारताच्या महासत्तेकडे वाटचाल करण्याच्या भूमिकेचा पायाच कच्चा राहत आहे. 
- गिरिजा सप्रे, सामाजिक कार्यकर्त्या 

Web Title: adarsh aai puraskar