पर्यावरणाशी नाते जोडा - डॉ. देखणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - ‘‘संतांनी तत्त्वज्ञानाचे सिद्धांत सांगताना हेतुपूर्वक निसर्गाचेच दृष्टांत दिले आहेत. यावरूनच पर्यावरणाशी नाते सांगणारी संतांची पर्यावरण दृष्टी ही दूरगामी होती, हे लक्षात येते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता केवळ भौतिक नव्हे, तर भावनिक अंगानेही पर्यावरणाशी नाते प्रस्थापित होण्याची गरज आहे,’’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

अकरावा किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे उद्‌घाटन गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. डॉ. देखणे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर डॉ. आमटे यांची प्रकट मुलाखत झाली. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. देखणे यांनी ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘वेद, उपनिषदे, प्राचीन साहित्य आणि संत वाङ्‌मयातून व्यक्त झालेले पर्यावरणाविषयीचे चिंतन आजच्या लोकजीवनालाही पर्यावरणाची वेगळी दृष्टी देऊन जाते. साहित्य म्हणजे एकीकडे अंतर्मनाशी, तर दुसरीकडे लोकमनाशी केलेला शब्दसंवाद आहे. हा संवाद मानवी पातळीवर सीमित न राहता माणूस निसर्गाशी बोलू लागतो, तेव्हाच निसर्गसंवाद घडतो. परंतु सध्या वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण, शहरीकरण, प्रदूषण, बदललेली जीवनशैली आणि निसर्गाला दुखावून काही तरी मिळवण्याचा हव्यास, यातून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.’’

Web Title: Add relationship with the environment