व्यसनमुक्तीसाठी एक पाऊल

Addiction
Addiction

पुणे - अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

पोलिसांनी वर्षभरात पावणेदोन कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी लावत त्यांना ते विकणाऱ्या ६२ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होत आहे.

तरुणाईतील अमली पदार्थांचे वाढते व्यसन लक्षात घेऊन त्याविषयी चिंता व्यक्त करीत पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी तरुणाईला या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी अमली पदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणांची, त्यांच्या ग्राहकवर्गाची माहिती घेतली. त्यानंतर तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. याबाबत संबंधित विभागाच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार

अमली पदार्थविरोधी कारवाई करताना त्यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कारवाईच नाही, तर महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधी जनजागृती कार्यक्रम आम्ही राबवीत आहोत. त्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेतली जाणार आहे.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com