मांजरीमध्ये दिपोत्सवातून व्यसनमुक्तीचा संदेश

manjari
manjari

मांजरी - व्यसनांच्या समाजातील  वाढत्या प्रमाणामुळे नवीपिढी सकारात्मकते पासून दूर जात आहे. त्यांच्या मनातील चंगळवाद काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती जनजागृतीची ज्योत आज घरोघरी प्रज्वलित करण्याची वेळ आली आहे, असे मत समर्थ शुगर फॅक्टरीचे संचालक प्रदीप मगर यांनी व्यक्त केले. 

मांजरी येथील अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृतीचा संदेश देण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्वलित दिव्यांच्या रचनेतून कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला. मगर यांच्या हस्ते दिवा प्रज्वलित करून त्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर घुले, निर्मला म्हस्के, पोलीस पाटील अमोल भोसले, विठ्ठल पवार, पांडुरंग घुले, रत्नमाला घुले, बाळासाहेब घुले, प्रतीक घुले, बसाप्पा भंडारी, मधुकर कवडे, माऊली घुले , रुपाली शिंदे, शीतल चांदणे आदी यावेळी उपस्थित होते.

सुख, समृद्धी, आरोग्यासाठी, एक दिवा लावा व्यसनमुक्तिसाठी. असे आवाहन करीत उपस्थितांनी के. के. घुले विद्यालयाच्या मैदानावर दिड हजार दिवे प्रज्वलित केले. महिला व लहान मुले मोठ्या संख्येने या दीपोत्सवात सहभागी झाले होते. कला शिक्षक भास्कर लोमटे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने व्यसनमुक्ती अभियान ही  दिव्यांची सजावट तयार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com