मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अतिरिक्त कोच; 'डेक्कन क्वीन'चे थांबे वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे : मध्य रेल्वेने कर्जत आणि लोणावळादरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मार्गावरील थांबेही वाढविण्यात आले आहेत. येत्या 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान या मार्गावरील पायाभूत सुविधांचे काम सुरू राहणार असल्याने मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. 

तपशील खालीलप्रमाणे आहेत :
• गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) महालक्ष्मी एक्सप्रेस एक अतिरिक्त स्लीपर क्लाससह.

• गाडी क्रमांक 11041 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस एक अतिरिक्त स्लीपर क्लाससह.

• गाडी क्रमांक 16381 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कन्याकुमारी एक्सप्रेस अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणीसह.

• गाडी क्रमांक 1101 9 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणीसह.

- अतिरिक्त थांबे : 

• गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे डेक्कन क्वीन दादर आणि ठाणे स्थानकांवर थांबविण्यात येईल.

• गाडी क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन कर्जत आणि ठाणे स्थानकांवर थांबविण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional coaches for Mumbai to Pune railway passengers