अतिरिक्त आयुक्तांची पालिकेला प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - शहरातील विकासकामांसोबत प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नव्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक रखडली असल्याचे महापालिकेतील अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे, विधिमंडळाचे अधिवेशन संपताच अतिरिक्त आयुक्तांची घोषणा होण्याचा अंदाज आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी या पदासाठी सहआयुक्त सुरेश जगताप, विलास कानडे आणि ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या नावांची शिफारस केली आहे. या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यातील काही नेत्यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे सरकारमधील वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे. 

Web Title: Additional Commissioner municipal