पुणे : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोरच मारहाण

pune.jpg
pune.jpg

पुणे : जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. 

जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने महापौरांच्या दालनात सोमवारी दुपारी आंदोलन सुरू केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे होते. नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकरांना काही प्रश्‍न विचारले. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी धंगेकर, शिंदे यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांसमोरच निंबाळकर यांना बेदम मारहाण केली.

या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडाली आहे. पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. अजूनही गोंधळ सुरू आहे.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com