उन्हाळी सुट्यांनिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

उन्हाळी सुट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-बलसाड मार्गावर ५२ फेऱ्या; तर पुणे-उदयपूर मार्गावर २४ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ९ एप्रिल ते ४ जुलैदरम्यान या गाड्या वाढणार आहेत. 

पुणे - उन्हाळी सुट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-बलसाड मार्गावर ५२ फेऱ्या; तर पुणे-उदयपूर मार्गावर २४ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ९ एप्रिल ते ४ जुलैदरम्यान या गाड्या वाढणार आहेत. 

पुणे-बलसाडसाठी आठवड्यातून दोनवेळा गाडी ९ एप्रिल ते ४ जुलैदरम्यान सुटणार आहे. दर मंगळवारी आणि गुरुवारी ही गाडी पुण्यावरून पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, १२ वाजून ४० मिनिटांनी बलसाडला पोचेल. बलसाडहून दर मंगळवारी आणि गुरुवारी पुण्यासाठी गाडी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. ही गाडी चिंचवड, लोणावळा, कल्याण, भिवंडीरोड, वसईरोड, बोईसर, वापी आदी स्थानकांवर थांबेल.पुण्याहून उदयपूरसाठी ११ एप्रिल ते २७ जूनदरम्यान जादा गाड्या धावतील. पुण्याहून दर गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी प्रस्थान करून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी उदयपूरला पोचेल. उदयपूरहून पुण्यासाठी ९ एप्रिलपासून दर मंगळवारी रात्री अकरा वाजून १० मिनिटांनी या गाडीचे प्रस्थान होऊन दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी ती पोचेल. लोणावळा, कल्याण, वसईरोड, सुरत, वडोदरा आदी स्थानकांवर ही गाडी थांबेल, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.

Web Title: Additional trains on the occasion of summer holidays