ज्यादा पाणी साठ्यासाठी तलावाची उंची वाढवू : रामचंद्र शिंदे

राजकुमार शहा
शनिवार, 28 एप्रिल 2018

गावोगावच्या तलावातील गाळ काढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन परिसरातील विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीबरोबरच भूगर्भातील पाणी पातळीतही वाढ होणार आहे.

मोहोळ : गावोगावच्या तलावातील गाळ काढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन परिसरातील विहिरी व बोअर यांच्या पाणी पातळीबरोबरच भूगर्भातील पाणी पातळीतही वाढ होणार आहे. ज्यादा पाणी साठ्यासाठी तलावाची उंची वाढवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले. 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गोटेवाडी ता. मोहोळ येथे तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा आरंभ जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार किशोर बडवे, गटविकास अधिकारी रतीलाल साळुंखे, महसूल नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर, लघू पाटबंधारे विभागाचे अभियंता आळगी रामचंद्र खांडेकर, उपसरपंच सोमनाथ जाधव, तुकाराम वळकुंडे, प्रभाकर खांडेकर, शत्रुघ्न खांडेकर, निवृत्ती होनमाने, मधुकर झेंडगे, आण्णा खांडेकर, मंडलाधिकारी एन के देव, मारे ग्रामसेवक पवार, तलाठी बागवान, दिपक तरंगे, सुनील चिपके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        
तालुक्यातील सहा गावातील गाळ काढण्यासाठी प्रांताधिकारी ढोले यांनी मंजूरी दिली असून, गोटेवाडी येथील गाळ काढण्याचे काम हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार आहे. अनुलोमने गाळ काढण्यासाठी जेसीबीचे सहकार्य केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ नेऊन जमिनीची सुपीकता वाढविण्याचे आवाहन तहसीलदार बडवे यांनी केले.

Web Title: Additional Water Supply of water will be Increase says Ramchandra Shinde