अधिक मासानिमीत्त खामुंडीत सामूहिक जावई पूजन

पराग जगताप
सोमवार, 21 मे 2018

ओतूर ता.जुन्नर - खांमुडी गावातील ज्या मुली लग्न करुन सासरी गेल्या त्यांच्या स्त्री सक्तीचा जागर तसेच स्त्री जन्माचे स्वागत करावे. या हेतूने खामुंडी ता.जुन्नर येथे पुरुषोत्तम मासानिमीत्त सामुदायिक जावईपूजनाचा कार्यक्रम रविवारी झाला.

येथील श्री काळभैरवनाथ ग्रामविकास ट्रस्टतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 200 जावई पत्नीसह सहभागी झाले. एकावेळा वीस जावयांचे पत्नीसह पूजन करण्यात आले. मुलीचे आई वडील किंवा भाऊ भावजय यांनी त्यांचे पूजन केले. यानिमीत्त गावात मोढा पाळण्यात आला होता.

यात रविवारी पहाटे श्री काळभैरवनाथांचा अभिषेक, देवास पोशाख, शिव व्याख्याते शंकर महाराज शेवाळे मंचर यांचा कार्यक्रम नंतर गोपूजन, जावई पुजन त्या नंतर महाप्रसाद म्हणजेच धोंडे जेवण झाले. यात सर्वांना पुरण पोळी व आमरसाची मेजवानी देण्यात आली. तसेच यावेळी आयोजकांकडुन जावयांना मानाची टोपी टावेल व पुर्ण पोशाख देण्यात आला. तर मुलीची ओटी भरुन साडीचोळी भेट देण्यात आली.

या आगळ्या वेगळ्या सोहळ्यास आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जि.प.सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, गटनेत्या आशा बुचके, गौरी बेनके, कृषी उत्पन्न बा.उपसभापती दिलीप डुंबरे, रघुनाथ लेंडे, बाळासाहेब खिलारी, पंचायत समिती सदस्य रंजना काळे, दिलीप गाजळे, ओतूर सरपंच बाळासाहेब घुले, काळवाडी सरपंच अंजली वामन, युवासेनेचे गणेश कवडे, ऋषीभाऊ डुंबरे, भाजपा अध्यक्ष भगवान घोलप, खांमुडी सरपंच माया गंभीर, श्री काळभैरवनाथ ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे, कार्याध्यक्ष सुभाष बोडके व सर्व विश्वस्त व ग्रामस्थ, पाहुणे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपेंद्र डुंबरे यानी केले तर आभार संदिप गंभीर यानी मानले.

Web Title: adhik masa pooja in junnnar