भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाचा सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चंद्रकांत घोडेकर
बुधवार, 25 जुलै 2018

घोडेगाव : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी आंबेगाव व खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आतापासूनच दुकानांच्या तपासण्या कराव्या. यावेळी पोलिस प्रशासनाने मदत करावी. प्लॅस्टिक घोंगड्यावरही बंदी असल्याने याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना खेडचे उपविभागीय अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समितीच्या हुतात्मा बाबू गेनू सभागृहात श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथील यात्रेनिमित्त आयोजित नियोजन बैठकीत आयुष प्रसाद बोलत होते.

यावेळी विभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, आंबेगावचे तहसिलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, खेडच्या गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एल.टी. डाके, रत्नाकर कोडीलकर, सुनिल देशमुख उपस्थित होते.

आयुष प्रसाद यांनी बैठकीत सर्वच अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. बैठकीत ठरल्याप्रमाणे कामे झाली पाहिजेत असे सुनावले. प्लॅस्टिक बंदी असल्याने या वर्षी त्यावर सर्वच विभागाने लक्ष ठेवावे. पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत, पोलिस यांनी एकत्र येऊन आतापासूनच दुकानांची तपासणी व दंड केले जावेत. यात्रा काळात वनविभागाने आवश्यक त्या ठिकाणी वनकर्मचारी नेमावेत. पर्यटकांना दिसेल असे सूचना फलक लावावेत. वनविभागाने 34 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केल्याचे बैठकीत सांगितले.

मंचर ते भिमाशंकर व राजगुरूनगर ते भिमाशंकर दरम्यान रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावेत तसेच यात्रा काळात दर तीन दिवसांनी पडलेले खड्डे भरून घेण्याच्या सुचना आयुष प्रसाद  यांनी दिल्या. मंदोशी व पोखरी घाटात दरड कोसळण्याच्या ठिकाणी आताच उपाययोजना करावी. या दोन्ही रस्त्यावरील पुल व मोऱ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. 

भीमाशंकर येथे आताही मागील सहा दिवसांपासून लाईट नाही अशी तक्रार विश्वस्तांनी केली. तसेच यात्रा काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या. 10 मिनीबस ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच पार्किंग व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांना सहकार्य करण्याच्या सुचना आयुष प्रसाद यांनी दिल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration to target total plastic ban in Bhimashankat Yatra