महापालिका कर्मचाऱ्‍यांवर राहणार प्रशासनाचा ‘वॉच’

कामकाजाच्या वेळेत चहा पिण्यासाठी जाऊ नका... लॉबीमध्ये गप्पा मारत बसू नका, कारण अशा कर्मचाऱ्यांवर आता महापालिका प्रशासनाचा ‘वॉच’ राहणार आहे.
Pune Municipal
Pune MunicipalSakal

पुणे - कामकाजाच्या वेळेत चहा पिण्यासाठी जाऊ नका... लॉबीमध्ये गप्पा मारत बसू नका, कारण अशा कर्मचाऱ्यांवर (Employee) आता महापालिका प्रशासनाचा (Municipal Administrative) ‘वॉच’ (Watch) राहणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक ट्रॅकिंग सिस्टिमचा (Treaking System) वापर करण्यास सुरुवात झाली आहे. (Administrative Watch on Municipal Employee)

महापालिकेचे सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वर्ग १ ते ३ च्या कर्मचाऱ्यांपेक्षा वर्ग चार अर्थात प्रत्यक्षात फिल्डवर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्‍यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाचा सुनियोजित वापर करण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Municipal
पुणे-सोलापूरसह तीन रेल्वे गाड्या रद्द

कर्मचारी ड्यूटीवर असताना कुठे काम करत आहे, याची माहिती बसल्या ठिकाणी समजावी; तसेच कार्यक्षमता वाढावी यासाठी आधुनिक डिव्हाईस असलेला रिस्ट बँड प्रत्येक कर्मचाऱ्‍याला देणार आहे. याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू केली आहे. तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर नियमित अंमलबजावणी करण्यात येईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

नक्की काय करणार?

  • प्रत्येक कर्मचाऱ्‍याच्या मनगटावर ‘जीपीएस’सारख्या प्रणालीचा बँड बांधणार

  • कामावर असताना हा बँड वापरणे बंधनकारक राहणार

  • कर्मचारी नेमका कुठे काम करत आहे, अथवा कुठे गेला?, याची माहिती कंट्रोल रूममध्ये मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com