पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पडली लांबणीवर

प्रवेश प्रक्रियेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Pune University
Pune UniversitySakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इंटिग्रेडेट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइनद्वारे अर्ज मागविण्यात येतात. (SPPU Pune News)

त्यानुसार प्रवेश परीक्षा परीक्षा घेण्यात येते. प्रवेश परीक्षेच्या निकालानुसार संबंधित विभागाकडून गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपासून प्रत्यक्ष प्रवेश अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे, अशा प्रक्रियेसाठी मुदत देण्यात आली होती. परंतु विद्यापीठाने ही प्रक्रिया आता पुढे ढकलली असून त्याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

Pune University
बैलगाडा शर्यतीबाबत स्टंटबाजी सुरु - अजित पवार

प्रवेशाचा अर्ज, कागदपत्रे संबंधित संकेतस्थळावर स्कॅन करून अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी करणे, प्रवेश परीक्षा, प्रवेश परीक्षेची गुणवत्ता यादी, प्रवेश निश्चिती अशी प्रवेशाची प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतु यापुर्वीच लांबलेली ही प्रवेश प्रक्रिया आता आणखी लांबणीवर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com