आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

संतोष आटोळे
शनिवार, 7 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या प्रवेशाच्या लॉटरीतून प्रवेश प्रक्रियेला पूर्वी देण्यात आलेल्या मुदतीत पहिल्या सोडतीच्या यादीत नाव निघालेल्या जिल्ह्यातील 10 हजार 284 विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी फक्त 6288 पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले होते.यामुळे मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा होत्या. त्यानुसार नविन निर्णयानुरुप पालकांना आता येत्या 10 एप्रिलपर्यंत शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

राज्यात सन 2018-19 साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशाची पहिली लॉटरी जाहीर करण्यात आली त्यानुरुप पालकांना त्यांच्या पाल्यांचा बुधवारी (ता.04 एप्रिल) पर्यत प्रवेश घेण्याचा शेवटचा दिनांक होता. मात्र, राज्यामधील अनेक शाळा या मुलांना प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी आल्या. यामुळे या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. अनेक शाळा विविध कारणे देत आरटीई प्रवेश नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे पालक हतबल झाले असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक शाळांमध्ये प्रवेश नाकारण्याचे काम सुरू असल्याने त्याचा फटका हा आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या एकूण 933 शाळांमध्ये 15 हजार 693 जागांपैकी पहिल्या सोडतीतील 10 हजार 284 जागांमधिल 6 हजार 288 प्रवेश झाले आहेत. मात्र काही नामांकित शाळेसाठी जागांपेक्षा प्रवेश अर्जांची संख्या जास्त आहे इतर ठिकाणी मात्र जागा रिक्तच आहेत.

आरटीई प्रवेशाच्या पहिल्या लॉटरीतून प्रवेश पालकांना त्यांच्या मुलांचे प्रवेश हे 10 एप्रिलपर्यंत घेता येणार आहेत. मुलांना प्रवेश मिळावा यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि महापालिकेचे प्रशासन अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना संचालनालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तर प्रतिसाद न दिलेल्या शाळांच्या तक्रारीसाठी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तक्रार निवारण कक्षात संपर्क साधावा, असे संचालनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: admission process for rte extended