विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! प्रज्ञाशोध परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

'एनटीएस' ही राज्यातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी महत्वाची परिक्षा आहे. दरवर्षी यामध्ये हजारो विद्यार्थी ही परिक्षा देतात. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा खोलीत प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित शाळांनी हे विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी 'राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा' (एनटीएस) 17 नोव्हेंबरला राज्यभर होणार आहे. या परिक्षेचे प्रवेशपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर 15 ऑक्‍टोबर पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर आहे. हे प्रवेशपत्र www.mscepune.in आणि http://nts.mscescholarshipexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर "राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा' (एनटीएस) आयोजित केली जाते. ही परिक्षा 17 नोव्हेंबरला राज्यातील 302 परिक्षा केंद्रांवर होणार आहे. यासाठी 7 हजार 90 शाळांमधील 94 हजार 451 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे.

'एनटीएस' ही राज्यातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी महत्वाची परिक्षा आहे. दरवर्षी यामध्ये हजारो विद्यार्थी ही परिक्षा देतात. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा खोलीत प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित शाळांनी हे विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे.

प्रवेशपत्र काढण्यास शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी राज्य परिक्षा परिषदेकडे 020-26123066/67 या क्रमांकावर संपर्क साधावा. nts.msce@gmail.com यावर ईमेल करावा. तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ येथे संपर्क साधावा, असे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admit Card for National Talent Search Examination test is available on the website