गडसंवर्धन समितीकडून दुर्गम भागातील पाच शाळा दत्तक

कृष्णकांत कोबल
बुधवार, 25 जुलै 2018

मांजरी- डॉ. राहुल झांजुर्णे आणि त्यांच्या पन्नास जणांच्या झेडप्लस गडसंवर्धन समितीने राजगडाच्या पायथ्याजवळील दुर्गम भागातील जिल्हापरिषदेच्या पाच शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत करण्याबरोबरच त्यांनी परिसरात देशी वृक्षांच्या तीन हजार बियांचे रोपन केले आहे. 

डॉ. झांजुर्णे आपला मुलगा शिवबा याचा वाढदिवस पारंपरिक अथवा पाश्चिमात्य पध्दतीने साजरा न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा करीत आहेत. त्याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त राजगड पायथ्याच्या सणसवाडी, देवपाल, पालखुर्द, खाटपेवाडी व भोसलेवाडी या गावांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २०० विविध पुस्तकांचे ग्रंथालय, प्रत्येक विद्यार्थ्याला रेनकोट, फुलस्केप वह्यांचा संच, डेंटल किट, पाचही शाळांसाठी सतरंज्या, आपत्कालीन औषधांचे किट व कंपास बॉक्स असे साहित्य देण्यात आले.

दरम्यान, डॉ. स्मिता यांनी मुलांना दाताचे आरोग्य कसे राखावे ह्याच्ये प्रात्यक्षिक दाखवले. सर्व कार्यकर्त्यांनी राजगडावर जाऊन रिठा, शिकेकाई, सागरगोटा , बेहडा, खैर, रामकाठीं, हिरडा, काटेभाबुळ, बोर, चिंच, करंज, आपटा, इलायती चिंच, सिसम, गुलमोहर, सुबाभूळ, शमी, सागवान, कडुलिंब अशा स्थानिक झाडांच्या 3000 बियांचे परिसरात रोपन केले. त्याचवेळी गडाच्या परिसराची स्वच्छताही केली.

डॉ. झांजुर्णे म्हणाले, "गली दोन वर्षापासून आम्ही समितीच्या माध्यमातून हे काम करीत आहे. मुलांनी पुस्तके वाचावीत व वाचन संस्कृती टिकून राहवी यादृष्टीने समितीचे कार्यकर्ते दर दोन-तीन महिन्याने शाळेत भेट देऊन पुस्तकांवर आधारित प्रश्न विचारणार आहेत. बरोबर उत्तरास छोटं बक्षीसही दिले जाणार आहे. याशिवाय नवीन कोणत्या विषयाची पुस्तके द्यायचीत ह्याचाही आढावा मिळेल.'

Web Title: Adoption of five schools in remote areas by the Gadsanvardhan committee