पाच वर्षांचा चित्रकार तो... 

Advait Kolarkar a Global Child Prodigy award
Advait Kolarkar a Global Child Prodigy award

जगातील हुशार १०० जणांमध्ये स्थान

पुणे - नाव अद्वैत कोलारकर, वय वर्ष अवघे पाच; पण कॅनव्हॉसवर चित्र काढताना जसा काय तो अनुभवी व्यावसायिक चित्रकारच असल्याचा भास होतो. त्याच्या या चित्रकलेतील बुद्धिमत्तेच्या जोरावर पुण्याच्या या बालकाने चक्क जगातील सर्वांत हुशार अशा १०० जणांमध्ये स्थान प्राप्त करत ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी’ हा पुरस्कार प्राप्त केला आहे. 

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनीही त्याचे कौतुक केले. 

अवघ्या आठ महिन्यांचा असतानाच अद्वैतने रंगांशी मैत्री केली. त्याला खेळायला रंग मिळाले नाहीत की तो लगेच रडायला लागायचा. आई-वडिलांनीही त्याची चुणूक बघून त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. अद्वैत दोन वर्षांचा असताना त्याचे पुण्यातील ‘आर्ट टू गॅलरी’ येथे ‘अद्वैत क्रिएटिव्ह वर्ल्ड’ हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. जानेवारी २०१८ मध्ये कॅनडातील चित्र प्रदर्शनात, तर एप्रिल २०१८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील आर्ट एक्‍सपोमध्ये तो सहभागी झाला होता. तेथे अनेकांनी त्याची चित्रे विकत घेतली होती.

जगातील हुशार मुलांची निवड करण्यासाठी ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड’साठी (जीसीपीए) अर्ज मागविले होते. यामध्ये जगभरातील ४५ देशांमधून विविध क्षेत्रांतील १५ हजार मुलांनी प्रवेशिका सादर केल्या होत्या. त्यातून अद्वैतची पहिल्या १०० बुद्धिमान मुलांमध्ये निवड करण्यात आली. अद्वैतची आई श्रुती कोलारकर म्हणाल्या, ‘‘अद्वैतला अगदी लहानपणापासून रंग व चित्र काढणे आवडत होते. एवढ्या लहान वयात त्याच्यात ही क्षमता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला प्रोत्साहन दिले. चित्रकलेच्या जोरावरच जगातील १०० बुद्धिमान मुलांमध्ये अद्वैतची निवड झाली आहे, याचा अभिमान आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com